ग्रंथालय प्रशासन

ग्रंथालयातील प्रशासकिय सेवा या विभागात उपलब्ध आहे.

कार्यकारी मंडळ बैठक व सर्वसाधारण सभा व सभेचे विषय या सुविधेमधे नोंदविता येतात. तसेच सभेची सुचना देणारे अजेंडा पत्र प्रिंट काढता येते. या मधे जावक क्रमांक, सभेचा दिनांक, सभेची वेळ व विषय इ. माहिती नोंदविता येते.

कार्यकारी मंडळ बैठक व सर्वसाधारण सभेमधे ठराव झाल्यानंतर प्रोसेडिंग अभिलेख नोंद करणे आवश्यक आहे. यामधे आवश्यक नमुण्यातील अभिलेख व पत्रक उपलब्ध आहे.

ग्रंथालयांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे वर्षाअखेर वार्षिक अहवाल सादर करणे आवश्यक असते. यामधे कव्हरींग लेटर, अहवाल, विवरण पत्र 1 व 2, अहवाल वर्षात ग्रंथालय घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची यादी, संचालक मंडळ यादी, नियतकालिके यादी, संदर्भ विभागाची माहिती, महिला व बाल विभागाची माहिती व इतर सर्व प्रकारची यादी/अभिलेख/पत्रके उपलब्ध आहेत. वार्षिक अहवाल स्वयंचलित असुन ग्रंथालयाने वर्षाभरात नोंद केलेल्या माहिती वरुन अहवाल तयार होतो. त्यासाठी वेगळी माहिती नोंद करण्याची आवश्यकता नाही.

ग्रंथालयात सभासदांकडून वेळोवेळी येणा-या तक्रारीची नोंद या सुविधेमधे करता येते.

ग्रंथालयास वेळोवेळी भेट देण्या-या मान्यवरांनी शेरे बुकात नोंद केलेल्या शे-याची नोंद या सुविधेमधे करता येते. आवश्यक नमुण्यातील अभिलेख उपलब्ध आहे.

ग्रंथालयाच्या सर्व संचालक मंडळातील पदाधिका-यांची नोंद या सुविधेमधे करता येते. आवश्यक नमुण्यातील यादी/अभिलेख उपलब्ध आहे.

ग्रंथालयांत वेळोवेळी होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद या सुविधेमधे करता येते. यामधे कार्यक्रमाचा दिनांक, वेळ, कार्यक्रमाचे नाव, प्रमुख पाहुण्याचे नाव, सुत्र संचालक व कार्यक्रमाचा तपशिल इ. नोंद करता येते. आवश्यक नमुण्यातील यादी/अभिलेख उपलब्ध आहे.

ग्रंथालयात वेळोवेळी येणारे पत्र आवक-जावक अभिलेखात नोंद करणे आवश्यक आहे. यामधे पत्र पाठवणा-याचे नाव व पत्ता, दिनांक, आवक-जावक क्रमांक व इतर माहितीची नोंद करता येते.