फ़ायदे

संगणकीकरणामुळे ग्रंथालयांना होणारे फ़ायदे!

ई-लायब्ररी संगणक प्रणालीद्वारे ग्रंथालयांचे ग्रंथ विभाग, नियतकालिके विभाग, सभासद विभाग, अकौंट विभाग, ग्रंथालय प्रशासन व इतर सर्व व्यवहार व यादी/अभिलेख/पत्रके करता येतात. तसेच समजण्यास व वापरण्यास सोपी आहे. त्यामुळे ही एक परिपुर्ण संगणक प्रणाली ठरते.

ई-लायब्ररी संगणक प्रणाली खास ग्रंथालयांसाठी विकसित करण्यात आली आहे. यासाठी ग्रंथालय कार्यप्रणाली, महाराष्ट्र ग्रंथालय अधिनियम, ग्रंथालय कार्यकरत्यांचे शिक्षण यांचा अभ्यास करुन ग्रंथालयांसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या संगणक प्रणालीतून ग्रंथालयांना आवश्यक त्या सर्व सेवा पुरविण्यात आल्या असुन, ही एक परिपुर्ण संगणक प्रणाली आहे. तसेच ग्रंथालयांचे कामकाज विनाकागद/पेपर-लेस पद्धतीने करता येईल.

ग्रंथालयांची कार्यप्रणाली ही पुर्णपणे मराठी भाषेमधे असल्यामुळे संगणक प्रणाली मराठी भाषेमधे विकसित करण्यात आली आहे. तसेच संगणक प्रणालीमधे द्विभाषिक पद्धतीने माहिती नोंदविता येते. उदा. काही ग्रंथ मराठी व काही ग्रंथ इंग्रजी असेल तरी आवश्यक माहिती नोंदविता येते.

ई-लायब्ररी संगणक प्रणाली पुर्णपणे मराठी भाषेत असुन ग्रंथालयांच्या गरज लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे ही संगणक प्रणाली शिकण्यासाठी सोपी आहे.

संगणक प्रणाली ही मोबाईल ॲप व वेबसाईट वर आधारित आहे. त्यामुळे संगणक खरेदीची आवश्यकता नाही. फ़क्त एक मोबाईल व प्रिंटर सह संगणकीकरण करता येईल. त्यामुळे मोठा खर्च व गुंतवणूक कमी होते.

ई-लायब्ररी एक परिपुर्ण संगणक प्रणाली असुन ग्रंथालयांसाठी आवश्यक सर्व 26 प्रकारचे अभिलेख उपलब्ध आहेत.

अभिलेख यादी पुढील प्रमाणे...

ग्रंथालयांनी ग्रंथ खरेदी केल्यानंतर सर्व ग्रंथ माहिती ही दाखल अंक अभिलेख, विषयवार ग्रंथ यादी, शासनमान्य ग्रंथ अभिलेख, रा.रा.रॉ.ग्रं.प्र देणगी ग्रंथ अभिलेख, परिगणन अहवाल व इतर यादी/अभिलेखांमधे नोंदविणे आवश्यक असते. परंतु संगणक प्रणालीच्या माध्यमातून फ़क्त एकदाच ग्रंथ माहिती नोंद करणे आवश्यक असते. त्या माहितीवरुन सर्व आवश्यक नमुण्यातील यादी/अभिलेख/पत्रके उपलब्ध होतात. त्यामुळे अधिकाधिक कामाची व वेळेची बचत होते.

तसेच अकौंटचे काम करण्यासाठी आपल्या ग्रंथपाल/क्लार्कला अकौंटींगचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. परंतु अकौंटीचे ज्ञान असलेले कर्मचारी ग्रंथालयांना मिळणे कठीण असते. अकौंटीगचे काम करताना कर्मचा-याला आर्थिक व्यवहाराची नोंद व्हावचर/पावती, रोजकिर्द, खतावणी इ. मधे करणे आवश्यक असते. त्यानंतर या व्यवहाराची/माहितीची गोळाबेरिज करुन जमा खर्च तयार करता येतो. या सर्व कामासाठी अनुभवी कर्मचारी आवश्यक असते.
परंतु संगणक प्रणालीच्या माध्यमातून काम केल्यास फ़क्त व्हावचर/पावती नोंद करणे आवश्यक असते, त्यावरुन रोजकिर्द, खतावणी, जमाखर्च, तेरिज पत्रक ताळेबंद व इतर माहिती पत्रके सहज उपलब्ध होतात. त्यासाठी अधिक माहिती नोंद करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कामाची व वेळेची अधिक बचत होते व कामातील क्लिष्ठता कमी होते.

वार्षिक अहवालात आर्थिक वर्षातील ग्रंथालयाची एकुण व्यवहारांचा सारांश नोंद असते. वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी किमान 3 दिवसांचा कालावधी लागतो. परंतु संगणक प्रणालीतून हे काम फ़क्त 10 मिनीटात पुर्ण होते व त्यासाठी स्वतंत्र माहिती नोंद करण्याची आवश्यकता भासत नाही.

यापद्धतीने ग्रंथालयाची एकुण कामकाजापैकी अधिकाधिक कामाची व वेळेची बचत होते.

ग्रंथालयांचे संगणकीकरण, मोबाईल ॲप व वेबसाईटवर आधारीत असुन स्वतंत्र संगणक, युपीएस, अँटी व्हायरस, संगणकाचा टेबल इ. साहित्य खरेदीची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रार्थमिक स्वरुपाची मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता नाही. त्यामुळे अंदाजे रु. 29000.00 ची आर्थिक बचत होत आहे.

तसेच लेखनसामग्री वर 50% खर्च कपात शक्य आहे.

अधिकाधिक कामाची बचत होत असल्यामुळे कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अधिकाधिक कामकाज करता येते.