ग्रंथ विभाग

ग्रंथ संदर्भातील सर्व सुविधा या विभागामधे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात किंवा देशात प्रकाशित होणा-या ग्रंथांपैकी ग्रंथ सर्व ग्रंथालये/ग्रंथालये खरेदी करतात. त्याच ग्रंथांची माहिती सर्व ग्रंथालये/ग्रंथालये आपल्या ग्रंथ दाखल अभिलेखात नोंदवितात. परंतु माहिती सर्व सारखीच असते. उदा. ग्रंथ नाम, लेखक, प्रकाशन, आवृत्ती, पृष्ट, किंमत व इतर. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व ग्रंथ भांडार या सुविधेच्या माध्यमातून एकात्मिक ग्रंथ माहिती साठवण केंद्र स्थापन केले असुन, प्रकाशित होण्या-या सर्व ग्रंथांची माहिती यामधे उपलब्ध असणार आहे. ग्रंथालयांनी/ग्रंथालयांनी यापैकी ग्रंथ निवडून ग्रंथ दाखल पुर्ण करायची आहे.

थोडक्यात! प्रकाशित होणा-या सर्व ग्रंथाची एकात्मिक साठवण यंत्रणा म्हणजेच ग्रंथ भांडार. यामधे प्रकाशित होणारे किंवा ग्रंथालयांच्या वापरात येणा-या ग्रंथांची ग्रंथालयांना आवश्यक माहितीची नोंद उपलब्ध आहे. ही नोंद नियतपणे अधिकाधिक वाढत जाणारी आहे.

ग्रंथालयांना आवश्यक ग्रंथ माहिती ग्रंथ भांडार मधे शोधायचा आहे व आवश्यक ग्रंथाचा भांडार क्रमांक निवडायचा आहे. यामुळे ग्रंथालयांना आवश्यक त्या ग्रंथा माहिती ग्रंथ भांडारातूनच उपलब्ध होईल व संपुर्ण ग्रंथ माहिती नोंद न करता ग्रंथ नोंदणी करता येईल.

जर आवश्यक ग्रंथ, ग्रंथ भांडार मधे उपलब्ध नसेल, तर ग्रंथाची सर्व माहिती नोंद करणे आवश्यक आहे. परंतु ही माहिती एकदा नोंद केल्यानंतर इतर ग्रंथालयांना/ग्रंथालयांना त्याचा ग्रंथाची माहिती पुन्हा नोंदविण्याची आवश्यकता नाही.

यामधे ग्रंथालयांमधे दैनंदिन ग्रंथ देव-घेव नोंद करता येते. ही नोंद बारकोड/RFID/मोबाईलच्या माध्यमातून करता येते.

ग्रंथ सभासदाला देताना, फ़क्त सभासद क्रमांक व ग्रंथ दाखल अंक नोंदविणे आवश्यक असते.

महत्वाचे! ई-लायब्ररीच्या माध्यमातून ग्रंथ देव-घेव करता येत असुल्यामूळे, ग्रंथ देतांना सभासदाची सही घेणे आवश्यक नाही. तरी देखील आवश्यकता असल्यास बुक कार्ड वरती सभासदाची सही घ्यावी! तसेच दैनंदिन ग्रंथ देव-घेव व्यवहाराची छापिल नोंद किंवा/प्रिंट घेण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता असल्यास PDF नमुण्यातील संगणकीकृत प्रत संग्रही ठेवावी. त्यावरुन आवश्यकता असल्यास प्रिंट काढता येईल. यामुळे छापिल ग्रंथ देव-घेव अभिलेखाची आवश्यकता भासणार नाही! व आर्थिक बचत होईल.

ग्रंथ भांडार च्या माध्यमातून ग्रंथाची अधिकाधिक माहिती नोंद करण्याचे काम कमी होते. परंतु ग्रंथ खरेदी/देणगी, ग्रंथ मांडणी संदर्भातील तपशिल सर्व ग्रंथालयांसाठी वेगळा असल्यामुळे या माहितीची नोंद करणे आवश्यक आहे.

संचालक मंडळाची मंजुरी प्रमाणे जिर्ण/फ़ाटलेले/गहाळ/ग्रंथ किंमत वसुल अशा ग्रंथांचे निर्लेखन करणे आवश्यक असते. या अभिलेखामधे ग्रंथ तपशिल, बाद करण्याचे कारण, वसुल किंमत, ठराव क्रमांक व दिनांक व इतर माहितीची नोंद करणे आवश्यक आहे.

ग्रंथ बाद करण्यासाठी बाद करावयाच्या ग्रंथाची यादी सर्व तपशिलासह संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करणे आवश्यक आहे. परंतु अशी यादी तयार करता यावी म्हणुन ग्रंथांची सर्व आवश्यक तपशिलासह नोंद करणे आवश्यक आहे.

फ़ाटलेल्या/बांधणी खराब झालेल्या ग्रंथाची पुनः बांधणी करणे आवश्यक असते. त्यासाठी बांधणीकाराला ग्रंथ देताना यादी करुन देणे आवश्यक असते. तसेच ग्रंथ परत घेताना यादी प्रमाणे ग्रंथ परत घेणे आवश्यक असते. यासुविधेतून अशी यादी सहज तयार करता येते.

ठराविक ग्रंथाची ग्रंथालयात मर्यादित प्रती असतील व त्या ग्रंथाला सभासदांची अधिक मागणी असेल तर ग्रंथ आरक्षणाची आवश्यकता भासते. आरक्षित केलेला ग्रंथ उपलब्ध झाल्यानंतर सभासदास सुचना करता येते.