सभासद विभाग

सभासद संदर्भातील सर्व सुविधा या विभागामधे उपलब्ध आहेत.

यामधे सभासदाची वैयक्तिक माहिती उदा. नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इमेल आयडी, जन्म दिनांक व इतर इ. माहिती नोंद करणे आवश्यक आहे. यानंतरच सभासदत्वाची माहिती नोंदविता येते.

सभासदाची वैयक्तिक माहिती नोंदविल्या नंतर सभासदत्वासंदर्भातील माहिती नोंदविणे आवश्यक आहे. उदा. सभासद प्रकार(मासिक/वार्षिक/विनाशुल्क/साखळी योजना सभासद), वाचक प्रकार(प्रौढ/बाल), नोंदणी दिनांक, अजिव/ संस्थापक सभासद आहे का? असल्यास शुल्क रक्कम, इ.

यानंतरच सभासदांना ग्रंथ देव-घेव/इतर व्यवहार करता येईल.

काही अपरिहार्य कारणास्तव सभासद सेवा बंद करत असेल तर, सभासदाकडील शिल्लक ग्रंथ/वृत्तपत्रे व नियतकालिके/वर्गणी जमा करुन घेऊन सभासदाचा योग्य त्या नमुन्यातील रद्द अर्ज घेणे अपेक्षित आहे.

सभासद रद्द झाल्यानंतर त्या सभासदाच्या ग्रंथालयातील सर्व सेवा खंडीत होतात.

यासुविधेमधे सभासदाचा फ़ोटो व सही नोंदविता येतो. ग्रंथ/वृत्तपत्रे व नियतकालिके देव-घेव करताना योग्य त्या व्यक्तिची सभासदत्वाची खात्री करुनच सुरक्षित व्यवहार करणे सहज शक्य होते.