नियतकालिके विभाग

वृत्तपत्रे व नियतकालिके संदर्भातील सर्व सुविधा या विभागामधे उपलब्ध आहेत.

ग्रंथालयात येणा-या नियतकालिकांची माहिती या सुविधेमधे नोंदविणे आवश्यक आहे. या मधे नियतकालिकाचे नाव, प्रकार, प्रकाशन, किंमत, वर्गणी दर इ. माहिती नोंदविता येते. तसेच याच माहिती वरुन हजेरी घेतली जाते.

ग्रंथाप्रमाणे नियतकालिकांचे देव-घेव करता येते. ग्रंथ देव-घेव प्रमाणे सभासदाचा क्रमांक व नियतकालिके हजेरी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.

ग्रंथालयात नियमित येणारे नियतकालिकांची नोंद घेणे आवश्यक असते. यामधे नियतकालिक हजेरी दिनांक, नियतकालिक, किंमत इ. माहिती नोंदविणे आवश्यक आहे. हजेरी घेतल्यानंतर नियतकालिकास एक दाखल अंक मिळतो. त्यावरुनच देव-घेव करता येते.

मासिके/साप्ताहिके/त्रैमासिके/द्वैमासिके/दिवाळी अंक यांची ग्रंथालयामार्फ़त वार्षिक वर्गणी भरली जाते.

ग्रंथालयाने रद्दी विक्री केलेले/हरवलेले/फ़ाटलेले/गहाळ झालेले वृत्तपत्रे व नियतकालिके बाद करणे आवश्यक असते. यासुविधेतून अशा वृत्तपत्रे व नियतकालिकांची नोंद करुन यादी तयार करता येते.