साधन सामग्री

ग्रंथालय संगणकीकरणास आवश्यक साधन सामग्री

मोबाईल/मोबाईल ॲप/वेबसाईट

सर्व कामकाज हे मोबाईलच्या माध्यमातून करता येते. ग्रंथालयातील सर्व कर्मचा-यांना मोबाईलवर ॲप सुरु करुन दिल्यानंतर ग्रंथालयातील नियोजित व नेमुण दिलेले कामकाज कर्मचारी करु शकतात.

इंटरनेट

संगणक प्रणाली इंटरनेट व आधुनिक तंत्रज्ञान "क्लाऊड" व आधारित असल्यामुळे इंटरनेट आवश्यक आहे. यामुळे ग्रंथालयातील कामकाज एककेंद्रीत स्वरुपाचे बनते. तसेच नोंदणीकृत माहिती "क्लाऊड" संगणक/सर्व्हर वर संग्रह होते.

प्रिंटर

ग्रंथालयातील कामकाज पुर्ण झाल्यानंतर आवश्यक माहितीची छापील प्रत काढण्यासाठी प्रिंटरची आवश्यकता आहे. WiFi-Laser प्रिंटर खरेदी करणे अधिक सोईस्कर आहे. मोबाईल वरुन थेट प्रिंट देऊ शकतो, याची खात्री करुनच प्रिंटर खरेदी करावा.